नवी दिल्ली : रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, पवार कुटुंबाचे घटक आहेत. त्यांच्यामुळे विलिनीकरण, अजित पवार यांचा अपघात याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी बोलणं हे अधिक विश्वासाचं असेल. म्हणून ते जे काय बोलतात ते तुम्ही ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी आणखी दाट संशय उपस्थित केला आहे. अजित दादांच्या विमानात कोणी बॉम्ब ठेवला होता का? कारण जेव्हा ते विमान आकाशात होतं आणि लँडिंगवेळ स्फोट झाला. अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केल्या आहेत, छगन भुजबळ यांनाही संशय येत असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आमचा घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणताय गप्प बसा. बजरंग बाप्पा सोनावणे, छगनराव भुजबळ, अमोल मिटकरी हे जबाबदारीने बोलत असणार ना? आता आपल्याच आमदारांवरती फडणवीस डाफरतायत, गप्प बसा सांगतायत, हे काही योग्य नसल्याचे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या इशार्यावर टीका
संजय राऊत म्हणाले की, या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दम देत सांगतायत याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण करा तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशासाठी धमकावता? त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्र परिवाराला, त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय? अशी विचारणा त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींच्या संदर्भातील तुलना आणि थेट प्रश्न
ते म्हणाले की, जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो, ते राजकारण नाही का? तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याची शक्यता होती असा संशय व्यक्त करतात. इथं एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? तुमचा काय त्यात हात आहे का? सगळ्यांचा हाच संशय असल्याचे ते म्हणाले. राऊत यांनी सांगितले की, रोहित पवार म्हणाले की, सुनिता काकींमध्ये मला अजित दादा दिसतात. अजित दादांकडे उपमुख्यमंत्री पद होतं, सर्व खाती होती. या सर्व गोष्टी सुनीत्रा काकींना मिळाल्या पाहिजेत. आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये.